भारत बंदच्या नावाखाली नगरमध्ये चक्क सरकारी कार्यालयच बंद
अहमदनगर : संजय गांधी निराधार योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनांसाठी शासनाने उत्पन्नाच्या दाखल्याची सक्ती केल्यामुळे हे दाखले मिळवण्यासाठी लाभार्थी नालेगाव मंडलाधिकारी कार्यालयात गर्दी करीत आहेत. मात्र नालेगावचे मंडळाधिकारी नागरिकांना कार्यालयात उपलब्ध होत नाहीत. मला प्रांत कार्यालयात काय आहे, कलेक्टर ऑफीसला काम आहे अशी उडवा उडवीची उत्तरे ते लाभार्थ्यांना देतात.
आज तर मंडळाधिकारी यांनी भारत बंदच्या नावाखाली कार्यालय बंद ठेवल्याने ते लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, येण्याजाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. त्यामुळे सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपा शहर मध्य मंडलाध्यक्ष अजय चितळे यांनी जिल्हाधीकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Post a Comment