यमुना लॉजिंग मधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा

 बाभळेश्वर चौकातील यमुना लॉजिंग मधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा



अप्पर पोलीस अधीक्षक   डॉक्टर दिपाली काळे  यांच्या  मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके, श्रीरामपूर शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी  संजय सातव, आयपीएस अधिकारी आयुष नोपाणी, अभिनव त्यागी  लोणी पोलीस ठाण्याचे समाधान पाटील यांच्या पथकाची कारवाई.

दोन  पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलेची सुटका व  दोन आरोपी ताब्यात

 दि.  16/ 12/2020 रोजी  पोलीस अधीक्षक मनोज पाटील  यांना  बाभळेश्वर चौकातील हॉटेल यमुना लॉजिंग  येथे मालक  प्रवीण बाळासाहेब पानसंबळ  हा   महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे  Dy.s.pसंदिप मिटके   Dy.s.p  संजय सातव, श्री नोपाणी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक,श्रीरामपूर शहर , श्री अभिनव त्यागी, स.पो.नि. समाधान पाटील व कर्मचारी यांचे पथक तयार करुन हॉटेल  यमुना लॉजिंग येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत महिलांची सुटका केली असून आरोपी क्रं,1) प्रवीण बाळासाहेब पानसंबळ   रा निर्मळ पिंपरी ता राहता 2) अरबाज मोहमद शेख रा बाभलेश्र्वर यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द  लोणी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे भा. द. वि. कलम 370 सह  स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956  चे कलम  3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post