ऑनलाईन मोबाईल ऍपवरील कर्ज घेताना सावधान..नंतर येईल पश्चातापाची वेळ

 ऑनलाईन मोबाईल ऍपवरील कर्ज घेताना सावधान..नंतर येईल पश्चातापाची वेळनवी दिल्ली : अगदी काही मिनिटांत कमी कागदपत्रे, जामीनदाराची गरज न घेता मोबाईल ऍपच्या साहाय्याने झटपट कर्ज घेणे खूप महागात पडू शकते. सध्या अशा मोबाईल ऍपव्दारे कर्ज देवून नंतर कर्जदाराला त्रास देणार्‍या कंपन्यांचे प्रस्थ वाढलं असून रिझर्व्ह बँकेने अशा कर्जापासून चार हात लांबच राहण्याचा सल्ला दिला आहे. शासनाच्या बँकिंग व नॉनबँकिंग अंतर्गत किंवा राज्य सरकारच्या सावकारी कायद्याच्या अखत्यारित नसलेल्या, कुठलीही परवानगी न घेता, ग्राहकांना फसविणार्‍या मोबाईल ऍॅपविरुद्ध तक्रारी करण्याचे आवाहन आरबीआयने केले आहे.

आरबीआयने म्हटले आहे की, अनधिकृत डिजिटल मोबाईल ऍॅपद्वारे कर्जवितरण कंपन्या ग्राहकांची लूट करीत असल्याच्या तक्रारी रिझर्व्ह बँकेकडे येत होत्या. बँकिंग व नॉनबँकिंग अर्थपुरवठा करणार्‍या संस्था रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत आहेत. फसवणूक करणार्‍या कंपन्यांबाबत माहिती घ्यावी. या कंपन्या कर्ज मंजुर करताना मोबाईलधारकाचा सर्व डेटा ऍक्सेस करतात. यात कॉन्टॅक्ट लिस्टही ऍक्सेस होत असल्याने नंतर त्या लिस्टमधील व्यक्तींना फोन करून कर्ज भरणा करण्यासाठी धमकावले जाते. अशा गोष्टीतून होणारा मनस्ताप टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post