राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक शाशंद्र त्रिपाठी यांना 'यशस्वी' पुरस्कार

 राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक शाशंद्र त्रिपाठी यांना यशस्वी पुरस्कार श्रीरामपूर दि ९ डिसेंबर गौरव डेंगळे -

टीम यशस्वी, कांदिवली मुंबई यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन प्रत्येक वर्षी सन्मानित करण्यात येते . आत्मा मालिक शैक्षणिक संकुल कोकणठाण,कोपरगाव येथील व्हॉलिबॉल खेळाचे क्रीडाशिक्षक श्री शाशेंद्र त्रिपाठी यांनी कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध खेळाचे प्रात्यक्षिक अत्यंत प्रभावीपणे शिकवली.तसेच त्यांनी प्रत्येक खेळाच्या मैदानाचे मोजमापे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवली.मागील ५ वर्षापासून श्री त्रिपाठी हे आत्मा मालिक क्रीडा संकुल मध्ये व्हॉलिबॉलचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय तसेच राज्य स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे त्यांनी संकुलात राष्ट्रीय  तसेच राज्य स्पर्धेचे आयोजन देखील केलेला आहे. त्यांच्या याच कामगिरीच्या जोरावर टीम यशस्वी यांनी दखल घेऊन त्यांना सन २०२० यशस्वी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री त्रिपाटी यांचे आत्मा मालिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष श्री हनुमंत भोगले,महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री पार्थ दोषी, शैक्षणिक अधिकारी श्री सुधाकर मलिक, क्रीडा विभाग प्रमुख श्री अजित पवार, श्री राजेन्द्र कोहकडे,श्री नितीन बलराज,सर्व शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post