चारचाकी वाहनात तलवारी बाळगणार्‍या जामखेडमधील एकास अटक

 चारचाकी वाहनात तलवारी बाळगणार्‍या जामखेडमधील एकास अटकनगर : चारचाकी वाहनातून बेकायदेशीरित्या तलवारी घेवून जाणार्‍या जामखेडमधील एकास स्थानिक गुन्हे शाखेने नगरमध्ये ताब्यात घेतले. अशोक बाळासाहेब राळेभात (वय26, रा.रत्नापूर, ता.जामखेड) असं आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राळेभात हा आपल्या इर्टिंगा कारमधून नगरमध्ये दिल्लीगेट रस्त्यावरुन जात असताना नीलक्रांती चौकात त्याची गाडी अडवून पोलिसांनी झडती घेतली. त्याच्या ताब्यातून चार तलवारी, चार चाकी वाहनासह एकूण 6 लाख 53 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. एलसीबीच्या पथकातील संदीप घोडके, विश्वास बेरड, भाऊसाहेब कुरुंद, दिनेश मोरे, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, सागर ससाणे, रोहित येमूल, रणजित जाधव, मयूर गायकवाड, जालिंदर माने, विजय धनेधर, सागर सुलाने यांनी ही कामगिरी केली. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post