या' नव्या स्मार्टफोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर ४० दिवस चालते... ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध

'या' नव्या स्मार्टफोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर ४० दिवस चालते... ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्धमुंबई: स्मार्टफोन वापरताना बॅटरी किती वेळ चालणार हा प्रश्न नेहमी विचारला जातो. टेक्नो कंपनीने देखील आपला नवा Tecno Spark 6 Go हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर स्टँडबाय मोडवर तब्बल 40 दिवस चालते असा दावा कंपनीने केला आहे.

Tecno Spark 6 Go हा फोन स्टँडबाय मोडमध्ये 40 दिवस राहू शकतो आणि एकदा चार्ज केल्यावर सलग 54 तास यावर संभाषण करू शकतो असा दावा कंपनीने केला आहे. दरम्यान, फ्लिपकार्टवर या फोनची विक्री 25 डिसेंबरपासून दुपारी 12 वाजता सुरू झालीआहे. 7 जानेवारीपासून तुम्ही ऑफलाईन स्टोरमध्ये या फोनची खरेदी करू शकता.

– 6.52 इंचाचा HD+ TFT डिस्प्ले

– स्क्रीन रिजॉल्यूशन 720×1600 पिक्सल

– डुअल रियर कॅमेरा सेटअप

– 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

– 5000 mAh ची बॅटरी

Tecno Spark 6 Go फोनची किंमत खिशाला परवडणारी आहे. 4 GB RAM + 64 GB स्टोरेजचा हा फोन 8 हजार 699 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post