शिवसेनेची गोची, औरंगाबादचे संभाजीनगर करण्यास कॉंग्रेसचा स्पष्ट विरोध
औरंगाबाद: औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि काँग्रेस पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहे. काँग्रेसने औरंगाबाद शहराचे नामकरण होऊ देणार नाही, असा पवित्राच घेतला आहे.
औरंगाबाद दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नामाकरण करण्याचस विरोध दर्शवला आहे. ‘औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर होऊ देणार नाही, आमच्या त्याला विरोध असेल, असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
Post a Comment