युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग, आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग

 'युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग

आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग'
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आठवलेंना हटके शुभेच्छा


नगर : आपल्या शीघ्र कवितांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खास कविता करून आठवले यांच्याच स्टाईलने शुभेच्छा दिल्या. ट्वीटरवर देशमुख यांनी आठवले यांचा फोटो व कविता शेअर केली आहे. गृहमंत्री देशमुख यांनी लिहिले आहे की, बा

बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी

बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी

पण आज दिवस आहे जल्लोषाचा कारण वाढदिवस आहे भारी कवीचा युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
@RamdasAthawale

Edited by-- सचिन कलमदाणे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post