पहीली मंडळी ( सी.एन.आय.) चा सतरावा वर्धापन दिन, नाताळ निमीत्त आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट

पहीली मंडळी ( सी.एन.आय.) चा सतरावा वर्धापन दिन, नाताळ निमीत्त आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट 


अहमदनगर : प्रार्थनास्थळे ही मानवी जीवनात आध्यात्म, शांतता व जगण्याचा उत्साह वाढवणारे प्रेरणास्रोत असून या माध्यमातून सत्कर्म करण्याची भावना जागृत होते, प्रभू येशू  ख्रिस्ताची शिकवण प्रेरणेतून आज समाज वाटचाल करीत असे प्रतिपादन नाशिक धर्मप्रांत रेव्ह. ए. यु. कसाब यांनी केले.

यावेळी कोरोना विषाणू प्रादुर्भाव व संसर्ग रोखण्यासाठी शासनाने निर्बंध लावलेले असल्याने आजचा कार्यक्रम मर्यादीत स्वरुपात आयोजीत करण्यात येते आहे.  अहमदनगर पहीली मंडळी ( सी.एन.आय.) चा सतरावा वर्धापन दिन व नाताळ सण  उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्त चर्च येथे आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली आहे. आ संग्राम जगताप यांनी चर्चला भेट देऊन वर्धापन दिन व नाताळ निमीत्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रेव्ह. एम. यु.कसाब.(बिशप.नाशिक धर्मप्रांत), रेव्ह. पॉल दुपारे (बिशप पुणे धर्मप्रांत) रेव्ह.संदीप वाघमारे, रेव्ह. डी. डी.सोनावणे, रेव्ह. सी. एन आठवले, आ. संग्राम (भैय्या) जगताप, नगरसेवक अविनाश (तात्या) घुले, सेक्रेटरी.मनस्विनी सोंतले,खजिनदार. सॅम्युअल खरात,  प्रसन्ना शिंदे, अमोल लोंढे, अजित ठोकळ, शिरीष लाड, राहूल थोरात तसेच पास्टरेट कमिटी तरुण संघ ज्येष्ठ संघ, शब्बाथ शाळा आणि सर्व चर्च सभासद उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post