राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांना कार्यालय पेटवून देण्याची धमकी

 

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांना कार्यालय पेटवून देण्याची धमकीपुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयंत रामचंद्र पाटील या व्यक्तीनं रुपाली चाकणकर यांना कार्यालयात तोडफोट करुन पेटवून देण्याची धमकी दिली आहे. रुपाली चाकणकर यांचे धायरी येथे कार्यालय आहे. या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी सदर व्यक्तीनं फोन करुन कार्यालय पेटवून देतो अशी धमकी दिली. धमकीचा फोन आला तेव्हा रुपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या माघारी परतल्यानंतर सदर घडलेला प्रकार स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी रुपाली चाकणकर यांना सांगितला. सिंहगड पोलिसांनी सदर व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post