'या' महापालिकेत कॉंग्रेस नगरसेवकांच्या हातात राष्ट्रवादीचे घड्याळ

राष्ट्रवादीने कॉंग्रेसलाही दाखवला हात, भिवंडी मनपातील १८ नगरसेवकांनी बांधले घड्याळमुंबई: आगामी ग्रामपंचायत व महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यनिहाय आढावा बैठक मुंबई येथे पार पडली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भिवंडी महानगरपालिकेचे उपमहापौर इम्रान अली मोहम्मद खान यांच्यासह १८ नगरसेवक, मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे माजी महापौर निर्मला सावळे, माजी विरोधी पक्ष नेता लियाकत शेख, औरंगाबाद सिल्लोडचे ठगन भागवत, अमरावती जिल्ह्याचे डॉ.मोईन देशमुख, निखत देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला. आगामी निवडणुकीत या मान्यवरांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, गृहमंत्री ना. अनिल देशमुख, कामगार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे, अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक, सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे  उपस्थित होते.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post