भारत बंद...राज्याचे मुख्यमंत्री नजरकैदेत

 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोपदिल्ली: शेतकऱ्यांच्या आजच्या भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी निघत असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अडवण्यात आले. त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपच्या इशाऱ्यावरूनच केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्ष केला आहे. तर, आम आदमी पक्ष केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरालाच तुरुंग बनवण्यात आल्याचा आरोप उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी केला आहे. केजरीवाल यांनी पोलिसांना शेतकऱ्यांसाठी तुरुंग बनविण्यापासून रोखलं. त्यामुळे केजरीवाल यांचं घरच तुरुंग बनविण्यात आलं आहे, असा आरोप सिसोदिया यांनी केला आहे. केजरीवाल यांना घरातच नजरकैदेत ठेवलेले नाही तर मग आपच्या कार्यकर्त्यांना दिल्लीत का रोखले जात आहे?, असा सवालही त्यांनी केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post