गांजाच्या शेतीवर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात
नगर : पाथर्डी तालुक्यातील एकनाथवाडी शिवारात शेतात लावलेल्या गाज्यांच्या झाडांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत जवळपास 30 झाडे जप्त करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी शेवगावचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व पाथर्डी पोलीस पथकाने गांजा असलेले झाडे लावलेल्या शेतात छापा घातला. पाथर्डी पोलीस ठाण्यात गांजा किती आहे, त्याची मोजामाप रात्री उशिरापर्यंत करत होते. त्यांनतर गुन्हा दाखल करण्यात येणार येईल अशी माहिती सुदर्शन मुंडे यांनी दिली. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी चौकशी ताब्यात घेतले आहे.
Post a Comment