नवीन वर्षात दुचाकी, चारचाकी वाहनांच्या किंमती वाढणार, आताच खरेदी करा...

 नवीन वर्षात दुचाकी, चारचाकी वाहनांच्या किंमती वाढणार, आताच खरेदी करा...मुंबई : नवीन वर्षापासून दुचाकी आणि चार चाकीच्या किंमती वाढणार असून वाहन घेण्याची इच्छा असलेल्यांनी नव्या वर्षाची वाट न पाहता आताच वाहन खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. देशातील कार उत्पादकांनी गाड्यांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कार महागणार आहेत. आता टू व्हिलरही महागण्याचे संकेत कंपन्यांकडून देण्यात आले आहेत. देशातील सर्वात मोठी टू व्हिलर उत्पादक असलेली कंपनी हिरो मोटोकॉर्पनत्यांच्या दुचाकींच्या किंमतीत दीड हजार रुपयांनी वाढ करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. देशात स्टील, ऍल्युमिनियम, प्लॅस्टिक आणि टू व्हिलरसाठी आवश्यक इतर धातूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे दुचाकींच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे.त्यामुळे दुचाकीच्या किमतीत वाढ होणार आहे.कार उत्पादक कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किमतीत वाढ करण्याचे स्पष्ट केले आहे. नवीन वर्षात दरवाढ करणार्‍या कार निर्मात्या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, फोर्ड आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचा समावेश आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post