बिहारमध्ये राजकारण बदलणार?...राजदची नितीशकुमारांना थेट पंतप्रधानपदाची ऑफर

 


बिहारमध्ये राजकारण बदलणार?...राजदची नितीशकुमारांना थेट पंतप्रधानपदाची ऑफरपाटणा : भाजपने  जदयूचे सहा आमदार फोडल्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठे पडसाद उमटले असून भाजप आणि जनता दल युनायटेडमध्ये तणाव निर्माण झाल्याचं वातावरण लक्षात घेता राष्ट्रीय जनता दलाने डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. नितीश कुमार यांनी एनडीएला सोडचिठ्ठी देऊन तेजस्वी यादव यांना बिहारचं मुख्यमंत्री केलं. तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी नितीश कुमार यांना देशाच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करू, असं विधान राजदचे नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी केलं आहे.  नितीश कुमार सध्या बिहारचे मुख्यमंत्री झाले असले तरी भाजपचं राज्यावर अधिकार सांगत असल्याचं स्पष्टपणे दिसतं, असं म्हणत राजद नेत्यांनी जदयू आणि भाजपमध्ये पडलेल्या ठिणगीला फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे. अरुणाचल प्रदेशमधील जदयूच्या 6 आमदारांना फोडून भाजपने आपल्या गटात सामील करुन घेतलं. त्यानंतर भाजप युतीधर्माचं पालन करत नसल्याचा आरोप करत जदयूने नाराजी व्यक्त केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post