बिनविरोध निवडणुकीसाठी बक्षिसांचे प्रलोभन चुकीचे, राज्य निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी
माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांची आ.रोहित पवार यांच्या आवाहनावर टिका
नगर : आ.रोहित पवार यांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी 30 लाखांचे बक्षिस देण्याचे जाहीर करणे हे प्रलोभन असून राज्य निवडणुक आयोगाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असे मत माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी व्यक्त केले आहे. ते नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
निवडणुकीतील प्रलोभने दाखवणे, दबाव आणणे, मसल पॉवर, मनी पॉवर यावर नियंत्रण ठेवण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाचे आहे. आमदार रोहित पवार 30 लाखांचे बक्षिस जाहीर करून प्रलोभन देण्याचे काम चालवले आहे. बिनविरोध निवडणुकांसाठी असे प्रलोभने दाखवणे चुकीचे असून यात लोकशाहीचा मूळ हेतूच नष्ट होत आहे. उद्या जिल्हा परिषद, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभेच्या निवडणुका पैशाच्या जोरावर बिनविरोध झाल्या तर मोठे उद्योजकच देश चालवतील. असे प्रकार रोखणे गरजेचे असून राज्य निवडणूक आयोगाने अशा प्रकारे ग्रामपंचायती बिनविरोध करण्याच्या आवाहनाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे, असे मत राम शिंदे यांनी व्यक्त केले.
Post a Comment