मटका व सोरट जुगार अडयावर छापा, ३४ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

 मटका व सोरट जुगार अडयावर छापा, ३४ हजार १०० रूपयांचा मुद्देमाल जप्तनगर : पोलिस अधीक्षक मनोज पाटील , अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पाईपलाईनरोड वरील एकविरा चौक बस स्टॉपच्या पाठीमागे आडोशाला असलेल्या कल्याण मटका व पप्पु प्लेईंग पिक्सरचे सोरट जुगार अडयावर छापा टाकुन एकुण ३ आरोपी ताब्यात घेवुन रोख रक्कम,मोबाईल,सोरट जुगाराचे साहित्य असा एकुण- ३४,१००/- रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी अशोक सुखदेव देवकाते (वय-२७ रा.पाईपलाईन हडको,), अर्जुन सुरेश जंगम (वय-३२ रा, पवन नगर अहमदनगर,), गंगाराम तात्याबा पवार (वय-३८ रा.गजराजनगर अहमदनगर) यांचे विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशनला  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई  उपविभागीय अधिकारी विशाल शरद ढुमे,  पोना बाबासाहेब भानुदास फसले, सचिन महादेव जाधव, बाबासाहेब मासाळकर,  राजेंद्र जायभाय यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post