आ.सुधीर तांबे यांना विधानपरिषदेत मोठी जबाबदारी

 

विधानपरिषदेत तालिका सभापतींची नियुक्तीमुंबई, दि. 14 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विधानपरिषदेत तालिका सभापती म्हणून प्रसाद लाड, सतीश चव्हाण, गोपीकिशन बाजोरिया आणि सुधीर तांबे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली. संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले.

 

विधानपरिषदेच्या कामकाजास सुरुवात झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय करून देण्यात आला. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून नवनिर्वाचित सदस्य सतीश चव्हाण, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून नवनिर्वाचित सदस्य जयंत आसगावकर, पदवीधर मतदारसंघातून नवनिर्वाचित सदस्य अरुण लाड तसेच नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून नवनिर्वाचित सदस्य अभिजित वंजारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघामधून नवनिर्वाचित सदस्य किरण सरनाईक या सदस्यांचा परिचय देऊन त्यांचे सभागृहातर्फे अभिनंदन करण्यात आले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post