स्नेहा देशमुख ठरल्या झी मराठीवरील ‘डान्सिंग क्विन’च्या उपविजेत्या

  स्नेहा देशमुख ठरल्या झी मराठीवरील ‘डान्सिंग क्विन’च्या उपविजेत्यानगर : नगरच्या स्नेहा देशमुख यांनी झी मराठी वाहिनीवरील डान्सिंग क्विन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत उपविजेतेपद पटकावले आहे. रविवारी सायंकाळी या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा झाला. यात देशमुख यांनी व्दितीय क्रमांकाचे बक्षिस मिळवून नगरची मान उंचावली आहे. तिला एक लाख रुपयांचा धनादेश तसेच नामांकित कंपन्यांचे गिफ्ट व्हाउचर्स मिळाले.
वजनदार डान्सिंग क्विन स्पर्धेत मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कोल्हापूर आदी शहरातील मुलींनी सहभाग घेतला होता. सप्टेंबर पासून जवळपास 13 ते 14 आठवडे ही स्पर्धा चालली. यात प्रत्येक फेरीत वेगवेगळे नृत्याविष्कार सादर करीत देशमुख यांनी परीक्षकांकडून वाहवा मिळवली व त्या अंतिम 6 स्पर्धकांमध्ये पोहचल्या. दि.27 डिसेंबर रोजी महाअंतिम फेरीतही त्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
डान्सिंग क्वीन स्पर्धेसाठी देशमुख यांनी अतिशय मेहनत घेतली. प्रत्येक फेरीत वेगवेगळ्या थीमवर त्यांनी बहारदार नृत्याविष्कार सादर केला. स्पर्धेचे किंग कोरिओग्राफर ओंकार शिंदे यांच्याकडून तिला बहुमोल मार्गदर्शन मिळाले. स्पर्धेच्या परीक्षक असलेल्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व आरजे मलिष्का यांनी वेळोवेळी देशमुख यांच्या नृत्यकलेला उत्स्फूर्त दाद देत कौतुक केलं. महाअंतिम सोहळ्यात आदेश बांदेकर यांनी स्पर्धकांना किताब देवून त्यांचे कौतुक केले. संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन अभिनेते अव्दैत दादरकर यांनी केले तर महाअंतिम सोहळ्यात सूत्रसंचालन निर्मिती सावंत यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post