नगर तालुक्यात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार, दिग्गजांची लागणार कसोटी
नगर : ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त नगर तालुक्यातील राजकारण तापणार असून 59 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यात अनेक मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणूक स्थानिक पातळीवरील असली तरी त्यात बड्या नेत्यांचा कस लागणार आहे. यात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माधवराव लामखडे, गोविंद मोकाटे, बाळासाहेब हराळ, सभापती कांताबाई कोकाटे, अभिलाष घिगे, हरिभाऊ कर्डिले, संतोष म्हस्के अशा अनेक दिग्गजांच्या गावात निवडणूक होत आहे. पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजारला ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा आहे. यंदाही ती परंपरा कायम राहणार का याबाबत उत्सुकता आहे. याशिवाय नगर शहराजवळील निंबळक, नवनागापूर या ग्रामपंचायतीची निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे.
Post a Comment