लाच प्रकरणी कालवा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यातलाच प्रकरणी कालवा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात नगर :शेतजमीनीत अनुदानित विहीर खोदण्यासाठी लाभ क्षेत्राखाली जमीन नसल्याचा दाखला देण्यासाठी लाचेची मागणी केलेल्या कालवा निरीक्षकाला पोलिसांनी लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाच प्रतिबंध विभागाच्या  पथकाने  ही कारवाई केली. या प्रकरणी कालवा निरीक्षक विनोद सोनवणे (वय ३०, अंजली अपार्टमेंट, मोरगेवस्ती) यांच्याविरुद्ध साडेतीन हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सोनवणे येथील वडाळा उपविभाग पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. चार हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीनंतर अखेर साडेतीन हजार रुपये घेण्याचे ठरले. त्यानुसार येथील संगमनेर रस्त्यावरील वडाळा उपविभाग पाटबंधारे कार्यालयात लाच घेताना पोलिसांनी सोनवणे यांना रंगेहाथ पकडले. लाच प्रतिबंध विभागाच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपाधिक्षक हरीष खेडकर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलिस निरीक्षक दीपक करांडे यांनी सापळा रचुन कारवाई केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post