नगर-दौंड रोडवर अपघात, लोणीव्यंकनाथ येथील चौघांचा मृत्यु

 नगर-दौंड रोडवर अपघात, चौघांचा मृत्यु नगर : नगर दौंड रस्त्यावरील पवार वाडीजवळ बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात लोणीव्यंकनाथ येथील चौघांचा मृत्यु  मृत्यु झाला.  राज विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे, बाजीराव बरकडे व प्रतिक नरसिंग शिंदे हे चौघे जण मोटारसायकलवरून लोणीव्यंकनाथ गावाकडे जात होते.  पवारवाडीनजीक उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हर टेक करत असताना नगरकडून सातार्‍या कडे जाणार्‍या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. यात राज विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे, बाजीराव बरकडे  हे जागीच ठार झाले.  ग्रामस्थांनी ट्रक चालकाला  पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलिसांची टिम अपघातस्थळी रवाना केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post