ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण सोडत, महादेव जानकरांचा तीव्र विरोध

ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच आरक्षण सोडत, महादेव जानकरांचा तीव्र विरोध मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याच्या निर्णयाला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी विरोध केला आहे. गावच्या प्रस्थापितांच्या हातात रिमोट जाईल, आणि घोडेबाजारही थांबणार नाही, अशा शब्दात जानकरांनी संताप व्यक्त केला. 

ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय रासपला अमान्य आहे. सामान्य, उपेक्षित समाजाला संधी मिळण्यासाठी थेट जनतेतून सरपंच निवडून येऊन त्यावेळीच आरक्षण सोडत निघायला हवी होती. मग ती खुली, एससी, एसटी, ओबीसी किंवा महिला वर्गासाठी राखीव अशी कुठलीही सोडत असो. मात्र आता गावातील प्रस्थापितांच्या हातात रिमोट जाईल, त्यामुळे या विधेयकाला आमचा विरोध आहे, अशी भूमिका जानकरांनी घेतली.घोडेबाजार थांबवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात असलं, तरी निवडणुकीनंतर सोडत काढली तरीही घोडेबाजार होणारच आहे. असं होतं तर जनतेतून सरपंच निवडण्याला आधी संमती का दिली? राष्ट्रीय समाज पक्ष दोन्ही सभागृहात विरोध करणार, असं जानकरांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post