माजी खा.दिलीप गांधी यांच्यामुळे अर्बन बँकेची प्रगती, शेवगावमधील बँकेच्या सभासदांचे निवेदन

 माजी खा.दिलीप गांधी यांच्यामुळे अर्बन बँकेची प्रगती, शेवगावमधील बँकेच्या सभासदांचे निवेदनशेवगाव : नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या ठेवी व वाढता विस्तार माजी खा. दिलीप गांधी यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. बँकेच्या विरोधी मंडळातील काही सभासद गांधी यांचा राजकीय पराभव करू शकत नसल्याने त्यांनी बँकेच्या हितास बाधा आणणारी अनेक कृत्ये वेळोवेळी केली आहेत. व्यक्तीद्वेषातून गांधी व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या तपासी अधिकार्‍यांनी विरोधी मंडळातील सभासदांशी संगनमत करून खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणारा अहवाल तयार केला आहे. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी बँकेच्या सभासदांनी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनावर नगराध्यक्ष राणी मोहिते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मन्सूरभाई फारोकी, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश मगरे, कॉंग्रेसचे डॉ. अमोल फडके, मनसेचे गणेश रांधवणे, नगरसेवक कमलेश गांधी, अशोक आहुजा यांच्यासह जगदीश धूत, अमोल घोलप, किरण भोकरे, बापूराव धनवडे, प्यारेलाल शेख, सूरज लांडे, दत्ता फुंदे, सुनील रासने, कासमभाई शेख, अशोक खिळे आदींच्या सह्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post