दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा नेहमीच्या पध्दतीनेच होणार
मुंबई : करोना महामारीच्या संकटामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. शाळा, कॉलेजचे कामकाज प्रत्यक्ष सुरु नसल्यानं दहावी, बारावीच्या बोर्ड परिक्षांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यापार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यंदा बारावी व दहावीच्या परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, परंतु काहीशा उशिरा म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे सांगितले. राज्यात सध्या नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले असले तरी आठवीपर्यंतचे वर्ग तूर्तास सुरु करणार नसल्याचही त्यांनी म्हटलं आहे. बोर्डाच्या परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांचा अभ्यास व परीक्षा पद्धतीचा विचार शिक्षण विभाग करत आहे.या संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञांशी विचारविनिमय सुरू असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Post a Comment