भाजपमधून महाविकास आघाडीत मोठं इनकमिंग? अजितदादांचा गौप्यस्फोट


तुमच्याकडील किती लोकं आमच्याकडे येतील हे तुम्हाला कळणारही नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपला सूचक इशारामुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या  विधान परिषदेच्या निवडणुकीत शिक्षक, पदवीधर मतदार यांनीही भाजपला नाकारले. येत्या चार महिन्यात तुमच्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. मी आधीच का सांगितले नाही, असे म्हणू नका असेही ते म्हणाले. पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने ते विधानसभेत बोलत होते. विधान परिषदेत नागपूरमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती, ती जागा भाजपने गमावली. त्याचा एका गटाला प्रचंड आनंद झाला, मात्र दुसरा गट अस्वस्थ झाला, असे सांगून पवार म्हणाले, पुण्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाच पराभव झाला.  धुळे-नंदुरबारमध्ये अमरीश पटेल जरी निवडून आले असले तरी, ते आमच्याकडूनच तिकडे गेलेले आहेत. ते कधी परत येतील, हे कळणार नाही, असा टोलाही  पवार यांनी लगावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post