लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती कार्यक्रमाला नगरसेवक, पदाधिकार्‍यांची अनुपस्थिती

 


लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती कार्यक्रमाला नगरसेवक, पदाधिकार्‍यांची अनुपस्थितीनगर : भारतीय जनता पार्टी नगर शहर शाखेच्यावतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गांधी मैदान येथील भाजपा कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, प्रदेश सदस्य ऍड.अभय आगरकर, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, सुनिल रामदासी, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, वसंत राठोड, सचिन पारखी, अजय चितळे, महेश तवले, तुषार पोटे, बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर धिरडे, अर्जुन लाड, किशोर कटोरे, ऋग्वेद गंधे, सिद्धार्थ नाकाडे, राहुल कवडे, शिवाजी दहिंडे आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी उपस्थित असले तरी महापौर, उपमहापौर तसेच महानगरपालिकेतील भाजपचे अनेक नगरसेवक अनुपस्थित राहिले. कार्यक्रमाला उपस्थित नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये या लोकांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली होती. अनेकांनी या प्रकाराबद्दल जाहीर नाराजीही व्यक्त केली. पक्षाच्या दिग्गज नेत्याला अभिवादन करण्यासाठीही वेळ नसलेले हे नगरसेवक, पदाधिकारी नेमक्या कोणत्या कामात इतके बिझी आहेत, असा सवालही उपस्थितांमधून विचारण्यात येत होता.

याप्रसंगी सुनिल रामदासी, वसंत लोढा, सचिन पारखी, अनिल गट्टाणी, तुषार पोटे आदिंनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याविषयी माहिती देऊन त्यांच्या नगरमधील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केले तर आभार तुषार पोटे यांनी मानले. यावेळी कैलास गर्जे, नितीन शेलार, अनिल सबलोक, पंकज जहागिरदार, नरेश चव्हाण, सुजित खरमाळे, साहिल शेख, आदेश गायकवाड, लक्ष्मीकांत तिवारी, अनिल गट्टाणी, सुधीर मंगलाराप्, राम वडागळे, अमोल निस्ताने, चंद्रकांत पाटोळे, सुमित बटूळे, सुबोध रसाळ, शैलेंद्र ओहोळ, आशिष अनेचा, किरण जाधव, हुजेफा शेख, प्रणव सरनाईक आदि उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक एल.जी.गायकवाड यांना भाजपच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post