शास्त्रीय गायनात शांतनु भुकन जिल्ह्यात प्रथम

 शास्त्रीय गायनात शांतनु भुकन जिल्ह्यात प्रथमअहमदनगर ( प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2020- 21 नुकताच ऑनलाइन पद्धतीने पार पडला. या महोत्सवात शास्त्रीय गायन प्रकारात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा विद्यार्थी शांतनु विजय भुकन ने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. त्याची विभागीय राज्य युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे. तसेच या स्पर्धेत ज्ञानेश्‍वरी अविनाश पांढरे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे संगीत शिक्षक परशुराम मुळे यांचे मार्गदर्शन लाभले. यश प्राप्त करणारे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक अध्यापकांचे संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापक दिलीप कुलकर्णी, पर्यवेक्षक संजय पडोळे, रवींद्र लोंढे, सुवर्णा वैद्य यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post