पंकजा मुंडे यांचे भोपाळमध्ये जोरदार स्वागत

 


पंकजा मुंडे यांचे भोपाळमध्ये जोरदार स्वागतभोपाळ : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने मध्यप्रदेश राज्याची सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार मुंडे यांनी मध्यप्रदेशात पक्ष संघटनेचे काम सुरु केलं असून आज त्या सकाळी भोपाळमध्ये दाखल झाल्या. त्यांचे भोपाळमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. या दौर्‍यात मुंडे स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटना मजबूतीकरणावर चर्चा करणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याने मुंडे सुरुवातीपासून उत्साहित आहेत. मध्यप्रदेशसारख्या मोठ्या राज्याचे सहप्रभारीपद मिळाल्याने मुंडे समर्थकांनाही त्यांच्या तेथिल कामाबाबत उत्सुकता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post