राष्ट्रव्यापी बंदला अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचा पाठींबा

 राष्ट्रव्यापी बंदला अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचा पाठींबा



अहमदनगर : केंद्रशासनाच्या कृषी कायद्याविरोधात देशातील  शेतकरी संघटनांनी आज पुकारलेल्या राष्ट्रव्यापी बंदला अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेने पाठींबा घोषीत केला असून संघटना आंदोलनात सहभागी झाली असल्याची माहीती संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी दिली.
केंद्र शासनाने नुकतेच केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत यासाठी दिल्लीत गेल्या बारा दिवसांपासुन शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून केंद्र शासनाच्या विरोधात आज शेतकरी संघटनांनी राष्ट्रव्यापी बंद पुकारला असून त्यास सर्व स्तरांतुन पाठींबा मिळत आहे.
कृषी कायद्यांप्रमाणेच केंद्र शासनाने नुकतेच कामगार विरोधी कायदे केले आहेत. त्यामुळे कामगारांचे अतोनात नुकसान होणार आहे. याचाच निषेध म्हणून जिल्हा कामगार संघटनने आजच्या शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या राष्ट्रव्यापी बंदला पाठींबा देत असल्याचे श्री.   लांडे  यांनी सांगितले.

यावेळी अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोषजी लांडे, किरण दाभाडे सर, पै.सुनील कदम, सागर सोनवणे, सनी शिंदे, जुबेर शेख, किरण गुंजाळ, संतोष भिंगारदिवे, अभिजित भिंगारदिवे, महेश आठवले, रोहित केदारे, नितीन कदम, शुभम भिंगारदिवे, मोना विधाते, रवी साठे, सागर मिसाळ,  अविनाश वानखेडे,  राहुल कसबे आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post