महामारीचा 2021 मध्ये अंत होणार !, बाबा वेन्गा यांची भविष्यवाणी

 महामारीचा 2021 मध्ये अंत होणार !, बाबा वेन्गा यांची भविष्यवाणीबुल्गेरियातील भविष्यवेत्त्या बाबा वेन्गा यांनी 2021 बाबत केलेली भविष्यवाणी धक्कादायक आहे. मात्र, त्याचबरोबर या वर्षात ऐतिहासिक शोध लागून जीवनात आमुलाग्र बदल होतील, असे भाकीत त्यांनी 2021 बाबत वर्तवले आहे. तसेच या वर्षात जनतेचा आधात्माकडे आणि धार्मिकतेकडे ओढा वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे. युरोप आणि अमेरिकेचे महत्त्व कमी होणार असून चीन जगावर राज्य करेल आणि हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू होईल, असे भाकीतही त्यांनी केले  आहे.

बाबा वेन्गा यांची ओळख बाल्कनच्या नास्त्रोदेमस अशी आहे. त्यांनी याआधी केलेल्या भविष्यवाणी तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. 1911 मध्ये जन्म झालेल्या वेन्गा यांची वयाच्या 12 व्या वर्षी अचानक दृष्टी गेली. त्यांच्या 1996 मध्ये मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी अनेक भविष्यवाणी केल्या असून अनेक भाकीतेही वर्तवली आहेत. त्यांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत.

सोव्हियत युनियनचे विघटन, 9/11 चा अमेरिकेवरील हल्ला, प्रिन्सेस डायनाचा अपघाती मृत्यू, जपानची त्सूनामी याबाबतची त्यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. तसेच 2020 मध्ये जागतिक महामारी येईल, त्यामुळे दीर्घकाळपर्यंत जगावर परिणाम होईल, ही त्यांची भविष्यवाणी कोरोना महामारीमुळे खरी ठरली आहे.त्यांनी केलेल्या भविष्यवाणींपैकी 90 टक्के भविष्यपाणी खऱ्या ठरल्याने त्यांनी 2021 बाबत केलेल्या भाकीतांबाबत उत्सुकता आहे.

2020 मध्ये आलेल्या महामारीचा 2021 मध्ये अंत होणार आहे. 2021 या वर्षात कर्करोगापासून मानवाला मुक्ती मिळणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात महत्त्वाचे शोध लागून मानवला कर्करोगावरील उपाय सापडेल आणि हा भयानक रोग इतिहासजमा होईल, असे भाकीतही त्यांनी केले आहे. आतापर्यंतची त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्याने 2021 बाबतची त्यांची भविष्यावाणी किती खरी होणार याची चर्चा सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे 2020 मधील कोरोनाच्या महामारीची अंत होईल असे त्यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post