खानदेशात भाजपला आणखी एक धक्का...अस्मिता पाटील यांचा पक्षाला रामराम

खानदेशात भाजपला आणखी एक धक्का...अस्मिता पाटील यांचा पक्षाला रामरामजळगाव- माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपला गळती लागली आहे. खडसे यांच्यापाठोपाठ भाजप आमदार आणि नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यातच जळगाव ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा अस्मिता पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

अस्मिता पाटील या भाजपच्या ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षा आणि बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या सदस्या देखील होत्या. आपण वैयक्तिक कारणासाठी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे अस्मिता पाटील यांनी सांगितले आहे. अस्मिता पाटील या भाजपमध्ये येण्याआधी राष्ट्रवादी पक्षात होत्या.  पाटील या राष्ट्रवादी दाखल झाल्या नाहीतर शिवसेनेत सुद्धा प्रवेश करू शकता, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post