दहावी, बारावी उत्तीर्णांना सैन्य दलात भरतीची संधी

दहावी, बारावी उत्तीर्णांना सैन्य दलात भरतीची संधी नवी दिल्ली : भारतीय सेनेने नुकतीच दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना देशाच्या सेवेत योगदान देण्यासाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

गया येथील भारतीय सैन्याच्या ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये एमटीएस, कुक, ड्रायव्हर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत. २ फेब्रुवारी २०२१ ही ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. 


भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, एमटीएस, कुक, ड्रायव्हर या पदांसाठी एकूण ८५ जागांची भरती करण्यात येणार आहे. बिहारच्या गयामधील भरतीसाठी दहावी आणि बारावी पात्र उमेदवारांसाठी भरती आयोजित करण्यात येत आहे.

 भारतीय सैन्याने गुजरातमध्येही आठवी, दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठीही भरती आयोजित केली आहे. स्टोअर कीपर, नर्सिंग असिस्टंट, सोल्जर (जनरल ड्यूटी), सोल्जर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन/दारूगोळा), सोल्जर ट्रेड्समॅन या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ जानेवारी २०२१ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट www.joinindianarmy.nic.in ला भेट द्यावी. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post