रेखा जरे खून प्रकरण...बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ, अटकपूर्व जामीन अर्ज....

 रेखा जरे खून प्रकरण...बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ, अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूरनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं नामंजूर केला आहे. मंगळवारी अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद पूर्ण झाला होता. त्यावर बुधवारी न्यायालयानं आपला निकाल दिला. यात बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. या गुन्ह्यात नाव समोर आल्यापासून बोठे फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. आता न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे व दुसरा आरोपी सागर भिंगारदिवे एकमेकांच्या संपर्कात होते. घटनेच्या दिवशी आणि त्याआधीही ते एकमेकांच्या संपर्कात आल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत, असा दावा सरकार पक्षातर्फे कोर्टात करण्यात आला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post