अभिनेता अनिल कपूरने ‘या’कारणामुळे मागितली वायूसेनेची माफी
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांच्या नव्या AK vs AK सिनेमाच्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. भारतीय वायुसेनेने काही गोष्टींवर आक्षेप घेतल्यावर अनिल कपूर म्हणाले की, त्यांचा किंवा निर्मात्यांचा उद्देश लोकांच्या भावना दुखावण्याचा नव्हता. या सिनेमातील एका सीनमध्ये IAF ची वर्दी घालून अनिल कपूर शिव्या देतात. यावरून अनिल कपूर यांनी एका व्हिडीओ जारी करून भारतीय वायुसेनेची माफी मागितली आहे. अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केलं आहे आणि २४ डिसेंबरला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
Post a Comment