शिवसेना मंत्र्याविरुध्द जादूटोण्याचा अघोरी प्रकार करण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शिवसेना मंत्र्याविरुध्द जादूटोण्याचा अघोरी प्रकार करण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

  


ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला.

एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणारे दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. अटक केलेली इसम हे अशा अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवत असून त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचे सांगितले जात आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post