सरपंच आरक्षण आता निवडणुकीच्या मतदानानंतर, ग्रामविकास विभागाचा नवा आदेश
मुंबई : सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2 अ नुसार सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. काही जिल्ह्यात निवडणूक पूर्व सरपंच आरक्षण निश्र्चित करण्यात आले आहे. यादरम्यान निवडणूक आयोगाने आज १४ हजार ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारी रोजी ही निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने आदेश जारी करीत जिथे सरपंच आरक्षण सोडत निघणे बाकी आहे त्याठिकाणी या सोडतीला स्थगिती दिली आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाची सोडत १५ जानेवारी नंतर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अहमदनगर तालुक्यातील एकुण 105 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाची आरक्षण सोडत 14 डिसेंबर 2020 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आता नव्या आदेशामुळे सरपंच आरक्षण सोडत निवडणूकीनंतरच होण्याची शक्यता आहे.
Post a Comment