पोलिस ठाण्यातच लाच, पोलिस कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यात

पोलिस ठाण्यातच लाच, पोलिस कर्मचारी 'एसीबी'च्या जाळ्यातसंगमनेर : संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बी. बी.देशमुख याला पोलीस ठाण्यातच एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. १२)संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास रंगेहात पकडले.

एका व्यक्तीने शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक देशमुख याच्याकडे होता.तक्रार देणाऱ्या व्यक्तीची पत्नी मिळून आल्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार बंद केल्याने देशमुख याने संबंधित व्यक्तीकडे एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या व्यक्तीने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली.पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे यांनी तक्रारदार व्यक्तीकडून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या देशमुख यास रंगेहात पकडले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post