दहा हजारांची लाच घेताना पोलिसाला पकडले
नगर: अकोले पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक संतोष वाघ हा सोमवारी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. त्याला दहा हजार रुपयांसह ताब्यात घेण्यात आले. एका शेतकऱ्याचा जमिनीबाबत वाद सुरू होता. झटपट मार्ग निघावा,यासाठी वाघ याने पैशांची मागणी केली. संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. पथकाने सोमवारी दुपारी अकोले पोलिस ठाण्यात सापळा लावला. दहा हजारांची लाच घेताना वाघला रंगेहात पकडण्यात आले.शासकीय विश्रामगृहावर त्याची चौकशी करण्यात आली. नंतर वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्याला अटक करण्यात आली.
Post a Comment