माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या कारखान्यात सुमारे ३८ लाखांची चोरी

 माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या कारखान्यात सुमारे ३८ लाखांची चोरीबीड: माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या परळी तालुक्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारख्यान्यात मोठी चोरी झाली आहे. कारखान्याच्या वर्कशॉप आणि स्टोअरमधून तब्बल 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य चोरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी 22 डिसेंबरला परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीच्या या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य लंपास करण्यात आलं आहे. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post