शनिशिंगणापुर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ जाहीर, 'यांना' मिळाली संधी

 शनिशिंगणापुर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ जाहीर नेवासा (गणेश मुळे): लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टची 11 सदस्यांची यादी धर्मदाय आयुक्त कार्यालयातुन जाहीर करण्यात आली आहे . विश्वस्तपदासाठी सुमारे 84 जणांनी अर्ज भरले होते . नगर येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात मुलाखती होऊन त्यातुन 11 सदस्यांची निवड करण्यात आली आहे . सन 2021 ते 2026 करीता 11 विश्वस्तांची निवड पुढील प्रमाणे जाहीर केली आहे .

विश्वस्त म्हणुन निवड झालेले सदस्य पुढील प्रमाणे - शिवाजी आण्णासाहेब दरंदले , दीपक दादासाहेब दरंदले , शहाराम रावसाहेब दरंदले , विकास नानासाहेब बानकर , भागवत सोपान बानकर , अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे , पोपट रामचंद्र शेटे , बाळासाहेब बन्सी बोरुडे , पोपट लक्ष्मण कु - हाट , छबुराव नामदेव भुतकर , सौ . सुनिता विठ्ठल आढाव यांच्या निवडी करण्यात आल्या . सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ हा दि . 5 जानेवारी 2021 रोजी पूर्ण होत असून त्यानंतर सदर नवीन सदस्यांचा कार्यकाळ सुरु होईल . .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post