*श्री स्वामी समर्थ केंद्र पिंपळाचा वाडा येथे अखंड नामजप सप्ताहाला सुरुवात*

 *श्री स्वामी समर्थ केंद्र पिंपळाचा वाडा येथे अखंड नामजप सप्ताहाला सुरुवात*


श्रीरामपूर/ गौरव डेंगळे:  येथील श्री स्वामी समर्थ केंद्र पिंपळाचा वाडा खंडाळा दत्त जयंतीनिमित्ताने अखंड नामजप यज्ञ सप्ताहास आज बुधवार २३ डिसेंबर पासून सुरुवात झालीे. हा सप्ताह ३० डिसेंबरपर्र्यंत चालणार आहे.सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. सप्ताहाची सुरुवात श्री स्वामी समर्थ वाचन, प्रहारे,श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण वाचनाने सुरुवात झाली.या मंगल सोहळ्यात स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला आहे. कार्यक्रमात ग्रामदेवता निमंत्रण, मंडल मांडणी, देवता स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, श्री गणेश याग, श्री मनबोध याग, श्री चंडी याग, श्री गीताई याग, श्री स्वामी याग, श्री रुद्रयाग, श्री मल्हारी याग, श्री दत्तजयंतीनिमित्ताने २९ रोजी दुपारी श्री दत्तजयंती जन्मोत्सव साजरा होईल.३० रोजी श्री सत्यदत्त पूजन व महाआरती सप्ताह सांगता सकाळी १०.३० वाजता महानैवेद्य आरतीने होईले. भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

*दैनंदिन कार्यक्रम*

*सकाळी ८:००* भूपाळी आरती

*सकाळी ८:३०*  श्री गुरुचरित्र ग्रंथ वाचन

*सकाळी १०:३०* नैवेद्य आरती

*दुपारी २:००* विविध याग

*सायंकाळी ६:००* नैवेद्य आरती

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post