पंचायत निवडणूक...शिवसेना कॉंग्रेसच्या साथीने उत्तर प्रदेशात योगींना भिडणार !
लखनौ: शिवसेनेच्या उत्तर प्रदेश शाखेने त्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेण्याचे जाहीर केले आहे. पक्षाचे खासदार अरविंद सावंत निवडणुकीच्या तयारीसाठी १६ जानेवारीला उत्तर प्रदेशात जाणार आहेत. या निवडणुका कॉंग्रेसच्या साथीने लढवण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती शिवसेनेचे उत्तर प्रदेश प्रदेश प्रमुख अनिल सिंह यांनी दिली.
ते म्हणाले की, पंचायत निवडणुकीसाठी जिल्हावार आढावा घेऊन पक्षाच्या वतीने प्रभारी नियुक्त केला जात आहे. सर्व जिल्ह्यांमधून अर्ज मागविण्यात येत आहेत. याशिवाय शिवसेनेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील संघटनेच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती देणार आहे.निवडणूक व्यवस्थापनाची माहिती जाणून घेण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात येणार आहे. हे लोक सुमारे एक आठवडा मुक्काम करतील. शिवसेना बीएमसी व ग्रामीण भागात कशी कार्यरत आहे, हे शिकवण्यात येणार आहे. तेथून परत आल्यानंतर पूर्वांचल, पश्चिम बंडल विभागात प्रशिक्षण होईल. यानंतर उमेदवारांची निवड करुन त्यांना मैदानात उतरवले जाईल. मागील निवडणुकीत 16 जिल्हा पंचायत सदस्य आणि 150 हून अधिक प्रधान निवडले गेले होते. काँग्रेससोबत युती करुन पंचायत निवडणुका लढवण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेना खासदार अरविंद सावंत 16 जानेवारीला राज्यात येणार आहे.
Post a Comment