ग्रामपंचायतीनंतर जिल्हा बँक,साखर कारखान्यांसह सेवा सोसायटी निवडणुकीचा धुरळा

 ग्रामपंचायतीनंतर जिल्हा बँक,साखर कारखान्यांसह सेवा सोसायटी निवडणुकीचा धुरळा नगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्याचा टप्पा पूर्ण झाला असून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्याबाबतचा पुढील टप्पा सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बुधवारी दिले.

प्राधिकरणाने ४ जानेवारी २०२१पासून सहकारी संस्थांची निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहे. राज्यभरातील ३८ सहकारी बँका, तसेच सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया सुरु कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे. त्यात नगर जिल्हा बँक, मुळा सहकारी साखर कारखाना(सोनई), लोकनेते घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना (भेंडा), बाबुर्डी घुमट सेवा सोसायटी,मांडवा विकास सोसायटी, खिर्डी सोसायटी, राजे शिवछत्रपती सोसायटी, सिद्धेश्वरवाडी सोसायटी,सारोळा कासार सोसायटी, मुंगूसगाव सोसायटी,मल्हार निंबोडी सोसायटी, माता साळवण देवी सोसायटी, माळवडगाव सोसायटी, कोरेगाव सोसायटी, जनाई सोसायटी या संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखवला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post