शासकीय इमारतींमध्ये ‘रेन हार्वेस्टींग प्रणाली


*शासकीय इमारतींमध्ये ‘रेन हार्वेस्टींग प्रणाली’तून जलस्त्रोतांचे बळकटीकरण करावे: राधाकृष्ण गमे
*दि,31 डिसेंबर 2020 (विमाका वृत्तसेवा):*


पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याच्या दृष्टीने 'रेन हार्वेस्टींग प्रणाली' राबविण्याची आवश्यकता गोदावरी प्रदुषण निवारण जनहित याचिका क्रमांक 176/2012 च्या अनुषंगाने समोर आली आहे. त्यामुळे नाशिक विभागातील विभागातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, निवासस्थानांच्या आवारात ‘रेन हार्वेस्टींग प्रणाली’ राबवून पाण्याच्या पनु:र्भरणाद्वारे जलस्त्रोतांचे बळकटीकरण करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी एका शासकीय परिपत्रकाद्वारे केले आहे.


विभागीय आयुक्त श्री.गमे यांनी या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, पाण्याच्या पुन:र्भरणाद्वारे पिण्याच्या जलस्त्रोतांचे करण्यासाठी जलसंधारणाचे विविध उपाय अमंलात आणून भूजलाची एकूण पातळी वाढविण्याचा प्रयत्न जलसंधारण विभागाकडून केला जात आहे. त्याअनुषंगाने जलसंधारण विभागाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन पाण्याच्या पुन:र्भरणाद्वारे जलस्त्रोतांचे बळकटीकरणात सर्वांना सहभागी होण्यासाठी प्रेरीत करण्याचे आवाहनही श्री.गमे यांनी या परिपत्रकाद्वारे सर्व विभागप्रमुखांना केले आहे.


नाशिक विभागात कार्यरत असलेल्या विविध विभागाच्या शासकीय इमारत, निवासस्थाने यांची जुनी बांधकामे आहेत. या शासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने व त्यांचे आवारात पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याच्या दृष्टीने सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, निवासस्थानाच्या आवारात रेन हार्वेस्टींग प्रणालीची अंमलबजावणी  करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी दिल्या आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post