इंग्लंडहून राज्यात परतलेल्यांपैकी १६ जण करोनाबाधित, नगरमधील एकाचा समावेश,

 *इंग्लंडवरुन आलेल्या प्रवाशांच्या विशेष सर्वेक्षणात १६ जण कोरोना पॉझिटिव्ह*मुंबई, दि.२६: इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला करोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, या संदर्भातील तपशील असा: आज पर्यंत ११२२ प्रवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात आली. 

यापैकी १६ प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत. 

( त्यात नागपूर – ४, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी -३, पुणे -२ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी १) अशी संख्या आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय रचना शोधण्यासाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत. 

बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित करोना बाधित आढळले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post