बसस्थानक परिसरात प्रवाशांकडील सोनं चोरणारी टोळी जेरबंद


बसस्थानक परिसरात प्रवाशांकडील सोनं चोरणारी टोळी जेरबंद



नगर:  बस स्टॅन्ड परीसरात प्रवासी लोकांचे सोने चोरी करणाऱ्या सराईत श्रीरामपुर येथील गुन्हेगारांच्या टोळीस राजुर पोलीस स्टेशन यांनी मुद्देमालासह केले जेरबंद.दि.26/12/2020 रोजी फिर्यादी कुसुम लक्ष्मण नाडेकर (वय 49 वर्षे,धंदा-घरकाम रा.पिचडशाळेजवळ, राजुर ता.अकोले जि.अहमदनगर) यांचे  राजुर ते कोहणे या बसमध्ये बसताना कोणीतरी अज्ञात इसमांनी फिर्यादीचे पर्स मधुन 96,000/-रु.किमतीचे सोन्याचा नेकलेस चोरुन घेवुन गेले.त्याबाबत फिर्यादी यांनी राजुर पोलीस स्टेशनला येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास सपोनि पाटील ,पोसई खैरनार करीत असताना श्रीरामपुरची सराईत टोळी यांनी गुन्हा केला आहे अशी गोपणीय माहिती मिळाल्याने पथकातील पोसई खैरनार,पोहेकॉ आघाव,फटांगरे,गाढे, वाडेकर अकोले पोस्टेचे पोकॉ मैड यांनी अकोले स्टैंड येथे जावुन आरोपी  साहिल नाशिर खान (वय 21 वर्षे,रा.वार्ड नं.3 सार्वजनिक संडासाजवळ श्रीरामपुर) ,अर्जन कानिफनाथ भोसले (वय 21 वर्षे,रा.वार्ड नं.2 अहिल्यादेवी नगर श्रीरामपुर), कमलेश उत्तम पवार (वय 21 वर्षे रा. वार्ड नं.2 अहिल्यादेवी नगर श्रीरामपुर) ,गुफरान निसार पठाण (वय 21वर्षे,रा.वार्ड नं.2 सोमेश्वर पथ श्रीरामपुर) यांना मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी यापुर्वीही  राजुर परीसरात गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

आरोपी यांना मुद्देमालासह राजुर पोलीस यांनी ताब्यात घेतले आहे तसेच तपास चालु आहे.सदरची कारवाई मा.श्री.मनोज पाटील सो.पोलीस अधिक्षक अहमदनगर,मा.श्रीमती दिपाली काळे, अप्पर पोलीस अधिक्षक,श्रीरामपुर व मा.श्री.राहुल मदने सो.उपविभागीय पोलीस अधिकारी,संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे अधिकारी सपोनि/नितीन पाटील व अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post