राष्ट्रवादीच्या अभिप्राय नोंदणीत नगर ओबीसी सेल राज्यात अव्वल

 *अभिप्राय नोंदणीत महाराष्ट्र राज्यात अहमदनगर शहराचा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या अमित खामकर यांचा पवारांच्या हस्ते सत्कार*



*अहमदनगर - राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अभिप्राय नोंदणीत राज्यात*


अहमदनगरच्या ओबीसी सेलने प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल राष्ट्रवादी ओबीसी सेलचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर यांचा पवार यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, खासदार प्रफुल्ल पटेल, नामदार नवाब मलिक, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश गवळी उपस्थित होते. 




0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post