श्रीगोंद्यात खळबळ...नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांचा राजीनामा

 श्रीगोंद्यात खळबळ...नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांचा राजीनामानगर: श्रीगोंदा तालुक्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष केशव मगर यांनी बुधवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक तोंडावर असताना मगर यांनी थेट कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या कारभारावर तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करीत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.  पत्रकार परिषदेस कारखान्याचे संचालक अण्णा शेलार,  पंचायत समितीचे सदस्य जिजाबापू शिंदे,  कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, बाळासाहेब काकडे, शांताराम भोईटे, रंगनाथ कुताळ, वैभव पाचपुते उपस्थित होते. मगर म्हणाले, ज्या त्यागातून दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांनी कारखान्याची उभारणी केली,त्याला  तिलांजली देण्याचे काम सध्या विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे  करीत आहेत. कारखान्यात साखर विक्री, मळी विक्री यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून मर्जीतील लोकांना अध्यक्षांनी महत्त्वाच्या पदावर बसल्याने कारखानाही घोटाळ्याचे केंद्र बनण्याचा थेट आरोप त्यांनी केला. सध्या सुरू असलेला कारभार हा शिवाजीराव बापूंच्या विचाराचा नसून चुकीच्या मार्गाने होत असल्याचे आपल्याला लक्षात आल्यानंतर आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post