चिंता वाढली...नगरमध्ये डिसेंबरमध्ये ११ जण लंडनहून आले... सर्वांची करोना चाचणी होणार

 नगरमध्ये डिसेंबरमध्ये ११ जण लंडनहून आले... सर्वांची करोना चाचणी होणार नगर : इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार आढळून आल्याने  शहरात  जगाची चिंता वाढली आहे. राज्यात सरकारने मागील काळात इंग्लंड येथून आलेल्यांंचा शोध सुरू केला आहे. यात नगर शहरात लंडनहून ११जण आल्याची माहिती समोर आली आहे. पाच वेगवेगळ्या कुटुंबातील या व्यक्ती असून, त्यांची कोरोना चाचणी होणार आहे. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी या माहितीला दुजोरा दिला. इंग्लडहून नगरला आलेल्यांमध्ये मार्केटयार्डमधील ०२, कराचीवालानगरमधील ०४, गुलमोहोर रोडवरील ०३, पाईपलाईनरोड व नवनागापूर येथील प्रत्येकी एक, अशा एकूण ११ जणांचा यात समावेश आहे. नगरमधील हे प्रवासी ७ ते २२ डिसेंबर दरम्यान आली आहेे.

महापालिकेतर्फेे या ११ जणांची कोरोबाबत आरटीपीआर चाचणी होणार आहे. या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एऩआयव्ही पुणे येथे पाविण्यात येणार आहे. या तपासणीतून इंग्लंडमधील नवीन विषाणू स्ट्रेनशी मिळताजुळता आहे का, याची तपासणी होणार आहे. या तपासणीत जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा पुढील २८ दिवस करता होईल. या प्रवाशांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post